|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चैत्री वारी साठी दोन लाख भाविक

चैत्री वारी साठी दोन लाख भाविक 

प्रतिनिधी /  पंढरपूर

मराठी वर्षातील पहिल्या असणाऱया चैत्री एकादशींचा सोहळा पंढरीत आज होत आहे. यासाठी सध्या पंढरीत दोन लाखांच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे सारी पंढरी नगरी ही गर्दीने फ्ढgलून गेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजची पंढरीची यात्रा करून अनेक भाविक शिखर शिगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेस जातात. त्यामुळे हरि-हर्रचा गजर आज पंढरीत होताना दिसून येईल.

चैत्री यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणावर भाविक दाखल झाले असल्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी गजबजून गेली आहे. चैत्री यात्रेंच्या निमित्ताने सध्या पंढरीत प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीठीची व्यवस्था करण्यात आली आहे. यातच विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनरांगेतही भाविकांना आवश्यक त्या सुविधासह उन्हाची तीव्रता लक्षात घेता मठ्ठा देण्यात येत आहे.

पदस्पर्श दर्शनरांग भुतेश्वर महादेव मंदिरापर्यत पोहचली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनसाठी साधारणपणे 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. तर मुखदर्शन 1 तासात होत आहे. उन्हाळयाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन मंदिर समितीच्या वतीने मंदिराभोवती आणि दर्शन रांगेमध्ये सावलींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मंदिराजवळ आणि दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय आहे.  

चैत्रंाrसाठी मोठया प्रमाणावर पोलिस फ्ढाwजफ्ढाटा तैनात करण्यात आला असून वाळवंटावर सीसीटीव्ही कॉमेऱयाचा तिसरा डोळाही कार्यन्वित करण्यात आला आहे. एकंदरीतच भावेकांच्या सोयीसाठी येथील प्रशासन संपूर्णपणे तत्पर असलेले दिसून येत आहे. विशेष म्हणजे या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागामधून साधारणपणे 1 हजार जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकादशींच्या निमित्ताने आज विठ्ठलाची सकाळी नित्यपूजा मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य अतुलशास्त्राr भगरे आणि रूक्मिणीमातेची पूजा समितीचे सदस्य भास्करगिरी महाराज करणार आहेत. पहाटेंच्या वेळी लवकरात लवकर नित्यपूजा उरकून भाविकांना सुलभतेने कसे दर्शन मिळेल, याकडे लक्ष देण्यात येणार आहे.

चैत्री यात्रेमध्ये भाविकांच्या सोबतच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला जाणाऱया कावडी येत असतात. आज कावडी चंद्रभागेंचे स्नान करून शिंगणापूरला मार्गस्थ झाल्या आहेत. मात्र यामध्ये सर्वाधिक कावडी आजच्या एकादशींला पंढरीत पहावयास मिळणार आहेत. विशेष या सर्व शंभू महादेवाच्या कावडींना चंद्रभागेमध्ये स्नान घालण्यात येते. चंद्रभागेत पाणीसाठा असल्याने कावडींना तसेच भाविकांच्या स्नानाची सोय झाली आहे. 

 

विठोबास आज पुरणपोळींचा नैवैद्य…

चैत्री एकादशीचे विशेष म्हणजे यादिवशी विठ्ठलास वर्षाची पहिली एकादशी आणि इतिहासात याच दिवशी विठ्ठलाची पुनर्स्थापना पंढरीच्या राऊळी झाली. याची आठवण म्हणून पुरणपोळींचा नैवैद्य दाखवला जातो. त्यामुळे पंढरीत आज भाविकांचा एकादशीचा उपवास असताना विठोबास पुरणपोळींचा नैवैद्य असतो.