|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » कुंवर सर्वेश कुमार सिंह यांना विजयाबद्दल साशंकता

कुंवर सर्वेश कुमार सिंह यांना विजयाबद्दल साशंकता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदार संघातील भाजपाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी आपला पराभव निश्चित केला आहे..

येत्या 23 एप्रिलला मुरादाबाद येथे मतदान होणार आहे. या मतदारसंघात मुस्लीम मतदार एकत्र आल्यामुळे कुंवर सर्वेश कुमार सिंह यांना यंदाच्या निवडणुकीत आपण निवडून येणार नाही, असे वाटत आहे. काँग्रेसनेही इम्रान प्रतापगडी यांनी मुरादाबाद संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर, सपा-बसपा-रालोद या आघाडीने एस. टी. हसन यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेस आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार मुस्लीम आहेत. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मतांचे विभाजन होईल आणि आपल्याला मतदान कमी होईल, अशी भीती कुंवर सर्वेश कुमार सिंह यांना वाटत आहे.