|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » दूरसंचार कंपन्यांचा महसूल 7 टक्क्यांनी वधारणार

दूरसंचार कंपन्यांचा महसूल 7 टक्क्यांनी वधारणार 

क्रिसिल संस्थेच्या अहवालात माहिती स्पष्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्या मागील दोन वर्षांपासून सलग घसरणीचा सामना करताहेत. परंतु चालू आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये ही स्थिती बदलण्याचे संकेत क्रिसिलच्या एका अहवालात नोंदवले आहे. दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्याच्या महसूलात जवळपास 7 टक्क्यांनी वाढ होण्याचे संकेत आहेत.

2019-20 मध्ये कंपन्यांमधील शुल्क युद्धात काही प्रमाणात स्थिरता येत नवीन रिचार्ज प्लॅन वापरात येणार आहेत. आणि त्यामुळे ग्राहकांच्या खर्चात होणाऱया वाढीवरच आगमी काळात महसूलात वाढ होणार आहे. त्याचाच फायदा कंपन्याना होणार असल्याचे म्हटले आहे.  

घसरणीला लागणार ब्रेक

2019-20मध्ये मुख्य तीन दूरसंचार कंपन्यामधील नेटवर्कचा विचार करता एकूण खर्च घटत जात 84,000 ते 90,000 कोटीवर राहण्याचा अंदाज आहे. तर दूरसंचार क्षेत्रात 2018-19 या कालावधीत एक लाख कोटी होता. 

अंदाज

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांचा महसूलात लवकरच प्रति व्यक्ती महसूलात 11 टक्क्यांची वाढ होणार असल्याचे संकेत क्रिसिलकडून देण्यात आले आहेत.