|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूर लोकसभेसाठी शांततेत पण चुरशीने 52 टक्के मतदान

सोलापूर लोकसभेसाठी शांततेत पण चुरशीने 52 टक्के मतदान 

प्रतिनिधी /सोलापूर :

दुसऱया टप्प्यातील सोलापूर लोकसभेसाठी गुरूवारी जिह्यात मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील प्रकार वगळता इतरत्र अत्यंत शांततेत आणि चुरशीने मतदान झाले. मतदारांनी रणरणत्या उन्हात ही मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मतदान केले असून सायंकाळी पाचे वाजेपर्यंत जिह्यात एकूण 18 लाख 50 हजार 2 मतदारांपैकी 9 लाख 62 हजार मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 52.01 इतकी आहे. ही माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, मतदानांची ही टक्क्sवारी सायंकाळी साडेपाच वाजण्यापर्यंत असल्याचे स्पष्टीकरण ही त्यांनी यावेळी दिले.

  या निवडणुकीत सर्वाधिक 55 .15 टक्के मोहोळ विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी शहर मध्यमध्ये 49.91 टक्के इतके मतदान झाले आहे. काही ठिकाणच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. त्या त्या ठिकाणी मशीन्स बदलून पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रात्री उशिर पर्यंत सर्वाना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देण्यात आली. सोलापूर केंद्रावर बॅलेट 18, कँट्रोल युनीट 15, व्हीव्हीपॅट 29 मशीन्स बदलले असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

 दरम्यान, लोकसभेच्या दुसऱया टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात केवळ सोलापूर जिह्यात शांततेत आणि चुरशीने मतदान झाले. सकाळी 7 वाजल्यापासून सहा ही मतदारसंघात मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सत्रात मतदान केंद्रावर संमिश्र प्रतिसाद मिळाला असून 4 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी मोठी गर्दी केली होती.

मतदानाच्या टक्केवारीचा तपशील पुढीलप्रमाणे

मोहोळ तालुक्यात 1 लाख 60 हजार 985 पुरूष तर 1 लाख 41 हजार 758 स्त्राrयांचे मतदान झाले असून एकंदरीत 55 टक्के इतके मतदान झाले आहे. उत्तर सोलापूरमधून 1 लाख 42 हजार 253 पुरूष, 1 लाख 36 हजार 625 स्त्राr असे एकूण 53.73 टक्के मतदान झाले तर सोलापूर मध्यमधून 1 लाख 47 हजार 431 पुरूष, 1 लाख 44 हजार 233 स्त्राrयांनी मतदान केले असून एकूण 49.91 टक्के, अक्कलकोट तालुक्यात 1 लाख 79 हजार 157 पुरूष तर 1 लाख 62 हजार 768 स्त्राr असे एकूण 51.21, दक्षिण सोलापूरमधून 1 लाख 60 हजार 839 हजार पुरूष तर 1 लाख 42 हजार 662 स्त्राr असे एकूण 50.28, पंढरपूर तालुक्यात 1 लाख 72 हजार 718 पुरूष तर 1 लाख 58 हजार 518 स्त्राr असे एकूण 51.93 टक्के इतके मतदान झाले. एकंदरीत जिह्यात 18 लाख 50 हजार 2 पैकी 9 लाख 62 हजार मतदारांचे मतदान झाले.

 जिल्हाधिकाऱयांनी उमेदवारांचे आक्षेप फेटाळले

सोलापूर जिह्यातील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये कपबशी किवा हात या चिन्हावर मतदान केल्यास भाजपच्या कमळ मतदान होत असल्याच्या तक्रारी वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले हेते. याविषयी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भोसले फेटाळले. याविषयी ते म्हणाले, याविषयी एकाही मतदारांनी तक्रार केलेली नाही. मतदान यंत्रे सुरक्षीत चालत होती. याठिकाणी गोंधळ झालेला नसल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.