|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » व्हॉट्सऍपमधून स्क्रीनशॉट घेता येणार नाही!

व्हॉट्सऍपमधून स्क्रीनशॉट घेता येणार नाही! 

मुंबई

 व्हॉट्सऍपमध्ये सध्या अनेक नवनवीन सुविधा लागू करण्यासाठी, काहीमध्ये बदल करण्यासाठी तर काहींवर बंदी घालण्यासाठीचे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यात सध्या आपण कोणाचाही स्टेटसचा फोटो, माहिती पटकन आपल्याकडे संग्रह राहावी यासाठी स्क्रीनशॉट काढून घेततो. पण आता आपल्याला कोणताही स्क्रीनशॉट काढता येणार नाहीत. तर त्याशिवाय इन्स्टाग्रामसारखे स्टीकर्स उपलब्ध होणार आहेत. या फिचर्सवर मागील अनेक दिवसापासून काम सुरु आहे. यामध्ये व्हॉट्सऍप ऍन्ड्राईड बीटा व्हर्जन अपडेट करता येणार आहे. या अपडेटनंतर युजर्सना चॅटचे स्क्रीनशॉट घेता येणार नसल्याचे डब्ल्यू ए बीटा इन्फो यांनी म्हटले आहे.