|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » यूएमएएनजी ऍपच्या आधारे पीएफसह अन्य सेवांचा लाभ घेता येणार

यूएमएएनजी ऍपच्या आधारे पीएफसह अन्य सेवांचा लाभ घेता येणार 

ऍप डाऊनलोड केल्यास संबंधित सेवा वापरणे होईल सोपे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ला

सरकारी कामासाठी तयार करण्यात आलेल्या यूनिफाइड मोबाईल ऍप्लिकेशनच्या आधारे वापरकर्ते विविध सुविधांचा लाभ घेऊ शकतात. उदाः कर्मचारी निवार्ह भत्ता (इपीएफ), पॅनकार्ड, आधारकार्ड, डिजिटल लॉकर, गॅस बुकिंग, मोबाईल बिल, लाईट बिल यासारखे व्यवहार करण्यासाठी एकाच ऍपचा वापर करता येण्याची सोय या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली आहे. सदरचे ऍप  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानासह नॅशनल ई-गव्हर्नर विभागाकडून या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे.

यूएमएएनजी ऍपच्या माध्यमातून आपण वरिल नमूद करण्यात आलेल्या सर्व सुविधांची माहिती घेऊ शकतो. आपल्याला उपयोगी असणारी सुविधा वापरण्यासाठी वेगळे ऍप डाऊनलोड करण्याजी आवश्यकता नसल्याचे ही यावेळी म्हटले आहे.

डाऊनलोड ऍप

सदरचे ऍप स्मार्टफोन, डेस्कटॉप आणि टॅबलेट यासारख्या डिव्हाईसवर डाऊनलोड करता येऊ शकतात. हे ऍप ऍक्टिव्ह करण्यासाठी यूएएन(यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर आणि इपीएफओसोबत असलेला नोंदणीकृत क्रमाकाचा त्यामध्ये समावेश करावा. 

ऍपच्या साहाय्याने अवघड काम सोपी

या ऍपचा वापर केल्यास आपल्याला ईपीएफशी संबंधित सेवांचा वापर करु शकतो. तर नोकरीच्या निमित्ताने आपण वेगवेगळय़ा ठिकाणी गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा तपशील पाहू शकतो.