|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » भाजप सरकारच जनतेला लागलेलं सुतक आहे

भाजप सरकारच जनतेला लागलेलं सुतक आहे 

 

 ऑनलाईन टीम / बीड  :  मुंबईला वाचवताना आमच्या शहीदांनी प्राणांची आहुती दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंहसारख्या ‘घरच्या भेदीं’नी तर शहीद हेमंत करकरेंबाबत बोलूच नये. भाजप हे सगळं सहनच कसं करतं? यांना लाज कशी वाटत नाही? खरतरं भाजप सरकारच आमच्या जनतेला लागलेलं सुतक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीका केली. भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन धनंजय मुंडे यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.