|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » एटीएसने साध्वी प्रज्ञाचा छळ केला नाही

एटीएसने साध्वी प्रज्ञाचा छळ केला नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मुंबईचे एटीएसप्रमुख शहिद हेमंत करकरे यांच्या आदेशावरून साध्वी प्रज्ञा सिंगचा छळ करण्यात आल्याचा आरोप मानवी हक्क आयोगाने फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही साध्वी प्रज्ञाचे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विनानकारण ओढल्याचा आरोप साध्वी प्रज्ञाने एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरेंवर शुक्रवारी केला. तसेच माझ्या शापामुळेच हेमंत करकरे मारले गेल्याचे वादग्रस्त तिने केले होते. त्यावर राजकीय वर्तुळात निषेध व्यक्त करण्यात आला. अखेर साध्वीने तिचे शब्द मागे घेतले आहेत. साध्वी प्रज्ञा भाजपच्या तिकीटावर भोपाळहून निवडणूक लढवते आहे. साध्वी प्रज्ञाला एकदाही एटीएसच्या ऑफिसला नेण्यात आले नव्हते. तसेच तिला कोठडीत डांबून तिची चौकशीही एटीएसने केली नव्हती, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते.