|Monday, August 26, 2019
You are here: Home » leadingnews » साध्वी प्रज्ञा सिंग या महान संस्कृतीचे प्रतिक : नरेंद्र मोदी

साध्वी प्रज्ञा सिंग या महान संस्कृतीचे प्रतिक : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / नवी मुंबई :

साध्वी प्रज्ञा सिंग यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक असून, काँग्रेसला ते महागात पडेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला दिला आहे. मोदी सरकारने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना लोकसभेची उमेदवारी कशी दिली? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळात सर्वत्र टीका होत असताना मोदींनी सध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.