|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

पवना धरणात बुडून तरुणाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / लोणावळा :

मावळातील पवना धरणात बुडून शनिवारी एका युवकाचा मृत्यू झाला. मागील दहा दिवसात या धरणात तीन युवकाचा बुडून मृत्यु झाला आहे.

अतुल अनिलकुमार गगन (वय 23, रा. पटना, सध्या राहणार इन्फोसिस हिंजवडी) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्क येथील पाच जण शनिवारी दुपारी पवनाधरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते धरणात पोहण्याकरिता उतरले. दरम्यान, खोल पाण्यात अतुल बुडाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्रची रेस्कू टिम घटनास्थळी दाखल झाली. शिवदुर्गचे महेश मसणे, सागर कुंभार यांच्या पथकाने सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास अतुलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.