|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पित्रोदांनी पुन्हा वाढविली काँग्रेस पक्षाची डोकेदुखी

पित्रोदांनी पुन्हा वाढविली काँग्रेस पक्षाची डोकेदुखी 

बालाकोट प्रकरणी सत्य बोलल्याचे विधान

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली 

काँग्रेसच्या घोषणापत्र समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांनी बालाकोट हवाई हल्ल्याप्रकरणी केलेले वादग्रस्त विधान योग्यच असल्याचे म्हटले आहे. आपण केलेले विधान योग्यच होते. माझ्या विधानानंतर पंतप्रधानांनी ट्विट केले, भाजप अध्यक्षांनी पत्रकार परिषद बोलावत टीका केली होती. तर काँग्रेस नेत्यांनी विधान का केल्याची विचारणा केली होती. पण जे काही बोललो ते सत्य होते, असे उत्तर पक्षाला दिल्याचे पित्रोदांनी सांगितले आहे.

राहुल गांधी यांचे महत्त्वाचे सहकारी पित्रोदा यांनी स्वतःच्या विधानाला योग्य ठरविल्याने काँग्रेसची पंचाईत होणार आहे. पित्रोदा यांच्या या टिप्पणीला भाजपकडून लक्ष्य केले जाऊ शकते. मी सत्य बोललो होतो, प्रश्न विचारण्याचा मला अधिकार आहे. प्रश्न उपस्थित केल्याने मी राष्ट्रवादी नसल्याचे म्हणता येणार नाही असे पित्रोदा यांनी म्हटले आहे.

वायुदलाने 300 दहशतवाद्यांना मारले असेल तर ठीक आहे, याचे पुरावे कुठे आहेत? वायुदलाने पाकिस्तानात नुकसान घडविल्याने काय फरक पडला? खरोखरच 300 जण मारले गेले का हे जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे विधान पित्रोदांनी केले होते.