|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » 23 मे ला मोदी फासावर : लालजीत राठीया

23 मे ला मोदी फासावर : लालजीत राठीया 

ऑनलाईन टीम / छत्तीसगड :

छत्तीसगढमधील रायगड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार लालजीत राठीया यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना फासावर लटकवण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही नेत्यांच्या प्रचार सभांवर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. तरीही प्रचारादरम्यान राजकीय नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत.

राठिया यांनी कुनकुरी विधानसभेच्या नारायणपूरमध्ये प्रचारसभेमध्ये हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे लालजीत यांच्यावर राजकीय वर्तुळात टीका होत आहे.