|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » बाबरी मशिद पाडण्यासाठी प्रयत्न केला, आता राममंदिर बांधणार

बाबरी मशिद पाडण्यासाठी प्रयत्न केला, आता राममंदिर बांधणार 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य ताजे असतानाच भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बाबरी मशिदीबाबत पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. ‘आपण बाबरी मशिदीवर चढलोच नव्हतो, तर तिला पाडण्यासाठीही मदत केली होती. आता आम्ही राम मंदिरही उभारू’ असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य साध्वी यांनी केले आहे.

साध्वी प्रज्ञा यांनी भोपाळमधील एका प्रचारयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. साध्वी म्हणाल्या, आम्ही मंदिर बनवणारच, शेवटी आम्ही बाबरी मशीद उध्वस्त करण्यासाठीही गेलो होतो. त्यावेळी मी स्वतः मशिदीवर चढून मशीद तोडली होती. ईश्वरानेच मला ही संधी दिली, शक्ती दिली आणि मी हे काम केले, याचा मला गर्व आहे. आता आम्ही तिथेच राम मंदिर बनवणार असे, साध्वी म्हणाल्या.