|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अमरसिंह पाटील फौंडेशनच्यावतीने भैरवनाथ मंदीर परिसराची स्वच्छता

अमरसिंह पाटील फौंडेशनच्यावतीने भैरवनाथ मंदीर परिसराची स्वच्छता 

वार्ताहर/ खोची

लाखो भक्तांच्या भक्तीविश्वाचा अधिपती भैरवनाथ या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदोल्हासाचा क्षण! बाहेरून येणाऱया भक्तांना अगदी सोयीस्करपणे दर्शन घेता यावे, पालखीला पालखीमार्गात कोणताही अडथळा येऊ नये, येणाऱया वाहनांच्यामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये. तसेच यात्रा अगदी निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी वाहतुकीच्या नियोजनापासून ते दर्शन रांगेच्या नियोजनाची जबाबदारी खोची येथील अमरसिंह पाटील फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोहिमेसारखी उत्कृष्टरित्या पार पाडली.

त्याचबरोबर आपण एक समाज म्हणून जगत असताना आपल्या गावाच्या ग्रामदैवतांच्या पारंपरिक उत्सवांना तितकेच महत्त्व असते. पण या यात्रेनंतर भैरवनाथ मंदिर परिसरात खूप कचरा आणि त्याबरोबर येणारी दुर्गंधी हा ऐराणीचा प्रश्न ठरतो. यांची दखल घेवून खोची येथील अमरसिंह पाटील सोशल फौडेंशनच्यावतीने महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत, जागृत देवस्थान श्री भैरवनाथ देवाच्या चैत्र (परगांव यात्रा) यात्रेनंतरची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

खोची (ता. हातकणगंले) येथील भैरवनाथ देवाची चैत्र यात्रा गुरूवार, शुक्रवारी संपन्न झाली. त्यामूळे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये चैत्रबन व पालखी मार्ग झाडून स्वच्छ करण्यात आला.

यावेळी प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, कागदी द्रोण विस्तारी, चहा-पाणी ग्लास, खेळणी बॉक्स, नारळ केसर, नाशवंत अन्न एकत्र करून जमा केले. कचऱयांची  योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

या स्वच्छ चैत्रबन अभियानात कार्यकर्ते झाडू, खोरे-पाटया घेवून मोठया उत्साहात सहभागी झाले होते. त्यामध्ये खोचीचे उपसरपंच अमरसिंह पाटील, जगदीश पाटील, जयंत पाटील, अमित सुतार, शिवतेज पाटील, अमित पाटील, प्रल्हाद जाधव, विजय वाघ, सुनिल जाखले, उध्दव पाटील, विकास पाटील, पप्पू बारगीर, बबन दाडमोडे, संदीप पाटील, प्रतिक पाटील, सत्यजित पाटील, अभिजित पाटील, जावेद कलावंत, स्वस्तिक उपाध्ये, ऋतूराज पाटील, संदीप मुसळे, अमित दाडमोडे, सागर गायकवाड, अश्विन गुरव, नंदकुमार पाटील, संजीत पाटील, अतुल पाटील आदीसह फौंडेशनचे अनेक कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने सहभागी झाले होते. यावेळी त्यांना व्ही. ए. बाबर व एस. बी. जाखले यांनी मार्गदर्शन केले.

फोंडेशनच्यावतीने ग्रामदैवत श्री भैरवनाथांच्या परगाव च्या यात्रेत भाविकांना  सुलभ दर्शन रांगेचे नियोजन केले होते. तसेच वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.