|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » वानखेडे स्टेडियमबाबत राज्य सरकाचा मुंबई क्रिकेट असोसिएशनला अल्टिमेटम

वानखेडे स्टेडियमबाबत राज्य सरकाचा मुंबई क्रिकेट असोसिएशनला अल्टिमेटम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमधील वानखेडे स्टेडियम वापराबाबतचा करार संपुष्टात आला असून, स्टेडियमचा वापर सुरु ठेवण्यासाठी सरकारने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे 120 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तशी नोटीसही सरकारकडून पाठविण्यात आलेली आहे. यामुळे आयपीएलवरील पुढील सामन्यांवरील अडचणी वाढण्याची शक्मयता आहे. राज्य सरकारने करार नुतनीकरण, थकीत कर आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी एमसीएला नोटीस पाठविली आहे. ही नोटीस 16 एप्रिलला मुंबई शहर जिल्हाधिकाऱयांनी पाठविली आहे. यामध्ये एमसीएकडून 120 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जर ही रक्कम देण्यात आली नाही तर एमसीएला परिसर रिकामा करावा लागणार आहे. यासाठी सरकारकडून 3 मे पर्यंतची तारीख यासाठी देण्यात आली आहे.

1975 मध्ये राजकीय नेते एस के वानखेडे यांनी हे स्टेडियम बनविले होते. त्यांचे असे म्हणणे होते की एमसीएकडे त्यांचे स्वतःचे स्टेडिअम असायला हवे. यावरून क्रिकेट क्लब ऑफ इंडायसोबतही वाद झाला होता. 43,977.93 चौ. मी मध्ये उभ्या असलेल्या या स्टेडियममध्ये एकावेळी 33 हजार प्रेक्षक बसू शकतात. राज्य सरकारने ही जागा एमसीएला 50 वर्षांच्या करारावर दिली होती. हा करार गेल्यावषीच्या फेब्रुवारमध्येच संपला आहे.