|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा आकडा वाढला

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा आकडा वाढला 

ऑनलाईन टीम / कोलंबो :

श्रीलंकेत रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढला असून, यामध्ये  सहा भारतीयांसह 290 जणांना मृत्यू झाला आहे, तर 500 हून जास्त लोक जखमी झाले आहेत. रविवारपर्यंत या स्फोटात केरळच्या महिलेसह चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. तर सोमवारी सकाळी आणखी दोन भारतीयांच्या मृत्यूची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.

श्रीलंकेतील पोलिसांनी सांगितले, बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या परदेशी नागरिकांमध्ये सहा भारतीयांचा समावेश आहे. तर सुषमा स्वराज यांनी कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तच्या ट्वीटला रिट्वीट केले आहे. काल झालेल्या स्फोटात आणखी दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याचे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. जी हनुमंतरायप्पा आणि एम रंगयप्पा अशी या मृतांची नावे आहेत.

दरम्यान, या बॉम्बस्फोटातून भारतीय अभिनेत्री राधिका शरतकुमार या थोडक्मयात बचावल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या. मात्र बॉम्बस्फोट होण्यापूर्वी त्या हॉटेलमधून बाहेर पडल्या.