|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दक्षिण आशियात मान्सून सरासरीत

दक्षिण आशियात मान्सून सरासरीत 

पुणे / प्रतिनिधी

 भारतासह दक्षिण आशियाई देशांच्या बहुतांशी भागात यंदाचा मान्सून सरासरीइतका राहणार असल्याचा अंदाज साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमने (सासकॉफ) व्यक्त केला आहे. देशातील पश्चिम किनारपट्टीचा बहुतांश भाग, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आदी भागात यंदा सरासरीपेक्षा कमी, तर जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, ओडिशा, तामिळनाडूसह भारताच्या पूर्व किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील. इतरत्र सरासरीइतका पाऊस राहणार असल्याचे ‘सासकॉफ’ने म्हटले आहे.

 दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची चौदावी दोन दिवसीय बैठक 22 व 23  एप्रिल या कालावधीत नेपाळच्या काठमांडू येथे झाली. भारतासह अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या  देशाचे हवामानतज्ञ आणि विविध हवामानविषयक संस्था यात सहभागी झाल्या होत्या. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा विचार करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

 प्रशांत महासागरात सध्या एल-निनोची स्थिती क्षीण आहे. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात ही स्थिती आणखी कमजोर होईल, असे यातील सहभागी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्टोबर 2018 पासून विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राच्या भूपृ÷ाचे तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या सुरुवातीच्या काळात समुद्राच्या पृ÷भागाचे तापमान खूपच वाढले होते. त्याचा परिणाम एल निनोवर झाला आहे. सध्या एल निनोची स्थिती कमजोर आहे आणि मान्सूनच्या हंगामादरम्यान ही स्थिती कायम राहणार असल्याचे काही जागतिक मॉडेल्स दर्शवितात. तसेच प्रशांत महासागरातील एल-निनोसह इंडियन ओशन डायपोल, युरेशियात उन्हाळा आणि हिवाळय़ातील बर्फाचे आच्छादन, जमिनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा मॉन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम होऊ शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

पश्चिम किनारपट्टीला फटका, कोकणात पाऊस कमी

 सासकॉफच्या अंदाजानुसार, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्मयता आहे, तर उर्वरित राज्यात सरासरी इतक्मया पावसाची शक्मयता आहे. कोकण, गोव्यासह कर्नाटक किनारपट्टी, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, ईशान्य भारताचा सीमावर्ती भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्मयता आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह उर्वरित भारतात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्मयता अधिक आहे.

महाराष्ट्रात उष्णतेची लाट

 दरम्यान, विदर्भात 28 एप्रिलपर्यंत, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातील तुरळक भागात 26 ते 28 एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.