|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » पेटकोव्हिक दुसऱया फेरीत

पेटकोव्हिक दुसऱया फेरीत 

वृत्तसंस्था/ बर्लिन

स्टुटगार्ट महिला टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत जर्मनीची अँजेलिक केर्बर व आंद्रेया पेटकोव्हिक यांच्यात लढत होणार आहे. पेटकोव्हिकने स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोचा पराभव केला.

सिमोना हॅलेपने माघार घेतल्यामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱया केर्बरला पहिल्या फेरीत बाय मिळाला असून दुसऱया फेरीत तिची मैत्रिण व देशवासी पेटकोव्हिकशी लढत होणार आहे. पेटकोव्हिकने टोर्मोचा 6-3, 6-4 असा पराभव केला. अन्य सामन्यांत बेल्जियमच्या ग्रीट मिनेन्सने स्लोव्हाकियाच्या डॉमिनिक सिबुल्कोव्हाला चकित करून दुसरी फेरी गाठली. तिची लढत पेत्र क्विटोव्हाशी होईल. जर्मनीच्या लॉरा सीगमंडने दुसरी फेरी गाठताना युक्रेनच्या लेसिया त्सुरेन्कोला नमविले तर ऍना लेना फ्रीडसमला संघर्षपूर्ण लढतीत हॉलंडच्या किकी बर्टेन्सकडून हार पत्करावी लागली. मर्टेन्सने रशियाच्या दारिया कॅसात्किनाचा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे.