हुबळीहून आलेल्या युवकाला कोरोना : शुक्रवारी 10 रुग्ण झाले बरे
प्रतिनिधी / बेळगाव
सलग दोन दिवसांच्या दिलासानंतर शुक्रवारी बेळगाव जिह्यात आणखी एक कोरोनारुग्ण आढळून आला आहे. हुबळीहून बेळगावला आलेल्या एका 42 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तर शुक्रवारी आणखी दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.
त्या 42 वषीय युवकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिह्यातील एकूण बांधितांची संख्या 302 वर पोहोचली असून बरे होणाऱया रुग्णांची संख्याही वाढली आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेला युवक मुळचा बैलहोंगलाच राहणारा असला तरी सध्या कामानिमित्त हुबळीत राहत होता.
उपचारासाठी तो बेळगाव येथील खासगी इस्पितळात आला होता. तेथून त्याला सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याची स्वॅब तपासणी करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हा युवक सिव्हिल हॉस्पिटलला येण्याआधी ज्या दोन खासगी इस्पितळात उपचारासाठी गेला होता तेथील कर्मचाऱयांमध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आणखी दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बिम्स्चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश दंडगी यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये हुक्केरी तालुक्मयातील 6, निपाणी येथील 3 व बागलकोट येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
शुक्रवारी आणखी एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिह्यातील एकूण बांधितांची संख्या 302 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 281 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 28 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
खास करुन यामध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे. तीन महिलांचे अहवाल वारंवार पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांची चिंता वाढली आहे. बेंगळूर येथील तज्ञांबरोबरही या संबंधी चर्चा करण्यात आली असून या गर्भवती महिलांवर कोणत्या पध्दतीने उपचार करायचे? या विषयी सल्लामसलत सुरु असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.