असंघटित क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर माहिती संकलन करण्याचे ध्येय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत असंघटित क्षेत्रात जवळपास 10 कोटी श्रमिकांची नेंदणी करण्यात आली आहे. ई-श्रम पोर्टलवर श्रमिकांची एकंदर नोंदणी करण्यात येऊन माहिती संकलन केली जाते.
सरकारकडून विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय डाटाबेस बनविण्यासाठी चालू वर्षातील ऑगस्टमध्ये ई-श्रम पोर्टलची सुरुवात केली आहे.
सीएलसी क्षेत्रात जास्तीत जास्त 100 दिवसांमध्ये संबंधीत प्रयोगाच्या कारणास्तव ई-श्रम पोर्टलवर जवळपास 10 कोटी श्रमिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्व अधिकारी काम करत असून जास्तीत जास्त श्रमिकांची नोंदणी करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे केंद्रीय मुख्य श्रम आयुक्तांनी सांगितले आहे.
29 नोव्हेंबरपर्यंतची स्थिती
सदरच्या पोर्टलवर 29 नोव्हेंबर 2021 पर्यंत 9.7 कोटी (9,69,82,091) श्रमिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये एक दिवस अगोदर जवळपास 15 लाख श्रमिकांची(14,95,993)वृद्धी झाल्याची नोंद आहे.