कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील वाघमोडेनगर भागात राहणाऱ्या महादेव शामराव चोरमुले यांच्या घरात गुरुवारी मध्यरात्री चोरी झाली. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
अज्ञात चोरट्यानी किचन रूमच्या दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला. यात घरात तिजोरीत ठेवलेली ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहे. पोलिसांनी चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव चोरमुले कुटुंबियांसोबत वाघमोडेनगर भागात राहतात. गुरुवारी मध्यरात्री ते घराच्या दरवाजाला आतून कडी लावून झोपले होते. चोरट्यांनी किचन रूमच्या दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला. घरात तिजोरीत ठेवलेली सोन्याचा नेकलेस, कानातील फुले, झुबे, मोबाईल मिळून ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन पोबारा केला. याबाबत चोरमुले यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.