नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या गणेशोत्सवाकरिता देशवासियांना शुभेच्छा देणारा संदेश प्रसारित केला आहे. कोरोनावर मात करण्याशी शक्ती गजानन आपल्या सर्वांना देवो अशी प्रार्थना करूया असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. हा उत्सव हा लोकांचा निर्धार आणि उत्साह यांचे प्रतिक आहे. तथापि, यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपण सावधपणे हा सण साजरा करीत आहोत. या निमित्ताने आपण परस्पर विश्वास, सहयोग आणि एकात्मता दृढमूल होईल अशी कामना करू. देशाने आतापर्यंत सर्व संकटांना यशस्वीरित्या परतवले आहे. याहीवेळी याचीच पुनरावृत्ती होईल. गणपतीबाप्पा आपल्या सर्वांना शक्ती देईल, अशी शुभकामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे.