जर्मनच्या संस्थेकडून 22000 : 2018 मानांकन
प्रतिनिधी / कोल्हापूर
उच्चतम गुणवत्तेवर ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) नेहमीच अग्रेसर राहिला आहे. गोकुळच्या कामगिरीची जर्मनमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेने दखल घेतली असून 22000:2018 हे मानांकन जाहीर झाले आहे. हे मानांकन मिळविणारा महाराष्ट्राच्या सहकारी दुग्धव्यवसाय क्षेत्रातील गोकुळ दुध संघ हा एकमेव व पहिला दूध संघ आहे.
जर्मनमधील एजन्सी टी. यु. व्ही. नॉंर्ड यांचे वरिष्ठ पातळीवरच्या अधिकायांनी नुकतीच गोकुळची पहाणी केली होती. या संस्थेच्या अधिकाऱांनी एक मार्च ते सहा मार्च 2021 या कालावधीत मुख्य दुग्धशाळेबरोबर विविध शाखांना भेटी देवून गोकुळच्या कामकाजाची तपासणी केली. तपासणीमध्ये विशेषतः उत्पादीत होणारे गुणवत्तायुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ, अन्न सुरक्षा कार्यप्रणालीनुसार होणारे कामकाज, प्लॅंट स्वच्छता, दूध व दुग्धजन्य पदार्थ पॅकींगसाठी वापरणेत येणारे पॅकींग मटेरीयल व पॅकींगवेळी निघणारे वाया गेलेल्या पॅकींग मटेरीयलची केली जाणारी निर्गत इत्यादी बाबींचा विचार करून मानांकन जाहीर केले आहे.
यापूर्वी गोकुळकडे शाखा व मुख्य दुग्धशाळेकडे सुरवातीस आयएसओ 9002, आयएसओ 9001:2008 ( अन्न व सुरक्षा कार्यप्रणाली ) व त्यानंतर 22000:2005 या कार्यप्रणालीनुसार कामकाज होत होते. याचीच पुढील सुधारीत कार्यप्रणाली म्हणून आएसओ 22000:2018 हे मानांकन प्राप्त झाले आहे.
एनडीडीबीच्या मामार्गदर्शनाखाली मुख्य दुग्धशाळेकडे क्यु-मार्क (गुणवत्ता व्यवस्थापन) ही कार्यप्रणाली देखील राबविली जात आहे. ही गुणवत्तेची मानांकने मिळाल्यामुळे दुध उत्पादक व ग्राहकांचा गोकुळवर असलेला विश्वास वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. तसेच गोकुळची उत्पादने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गुणवत्तेच्या जोरावर विक्रीस उपलब्ध करता येणार आहेत. ही भूषणावह बाब आहे.
कोरोना महामारीतही अधिकारी व कर्मचाऱयांनी मानांकन प्राप्त करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच जिह्यातील दूध उत्पादकांनी चांगल्या प्रकारचे दूध घातल्यामुळे हे मानांकन मिळवणे शक्य झाले आहे. यामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांना ग्राहकांडून चांगल्या प्रकारे मागणी वाढणार आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांना चांगल्या प्रकारे परतावा देणे शक्य होणार आहे. रवींद्र आपटे – चेअरमन गोकुळ दूध संघ