कोरोनाची तिसरी लाट येणे आता अटळ दिसत आह़े लसीकरणाचा वेग वाढवून अधिकाधिक नागरिकांचे जीवन निर्धोक करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत़ ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे प्रंट लाईन वर्कर्स यांना वर्धक मात्रेसाठी बोलावले जात आह़े यामुळे जोखमीच्या व्यक्तींना अधिकाधिक संरक्षण मिळण्याची व्यवस्था केली जात आह़े त्याचवेळी व्यापारी आणि ग्राहक वर्गामध्ये संपूर्ण टाळेबंदीची धास्ती व्यक्त केली जात आह़े
कोरोनाच्या लाटांमध्ये अनेक लोकांना बाधा होत असली तरी लसीकरणांमुळे या साथीची तीव्रता कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े सुरूवातीच्या टप्प्यात लसीची उपलब्धतता कमी प्रमाणात होत़ी आता मात्र पुरवठा वाढला आह़े यामुळे समाजातील अधिकाधिक पात्र व्यक्तींपर्यंत लसीकरणांचा लाभ पोहोचवला जात आह़े अधिकाधिक व्यक्तींना लसीकरणाचे महत्व समजावून देऊन लसमात्रा घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आह़े शहरात तसेच ग्रामीण भागात लसीकरणाविषयी आणखी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे दिसून येत आह़े
कोरोनाच्या दोन लाटा यापूर्वी येऊन गेल्या आहेत़ साथीच्या आजारांमुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा यापूर्वीच उघड झाल्या आहेत़ कोणत्या जागी बळकटी करणे आवश्यकता आह़े हे आरोग्य यंत्रणेच्या पर्यायाने शासनाच्या लक्षात आले आह़े यावर उपाययोजनेचा व्यापक कार्यक्रम अपेक्षित होत़ा आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाचा दीर्घकालीन आणि तात्पुरता असा विशेष कार्यक्रम अपेक्षित होत़ा मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री, अन्य साधने, औषधे अशा अनेक मुद्यांवर काम होणे अपेक्षित होत़े
जिल्हा परिषद आणि राज्यस्तरीय अशा दोन्ही टप्प्यांवरील सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये पुरेसे मनुष्यबळ नाह़ी परिचर, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग कर्मचारी अशी अनेक पदे रिक्त आहेत़ या पदांच्या भरतीसाठी विशेष मोहीम राज्य सरकारने मध्यंतरी हाती घेतली होत़ी परंतु परिक्षा सुरळीतपणे पार पडू शकली नाह़ी परीक्षेचे कार्यवाही करणाऱया यंत्रणेतील गोपिनीयतेपासूनचे अनेक दोष उघड झाल़े यामुळे परीक्षा रद्द झाल़ी त्यामुळे भरतीसाठी शासकीय स्तरावरून पाठपुरावा झालेला नाह़ी
जिल्हा पातळीवर तात्पुरत्या कालावधीसाठी अर्ध आरोग्य कर्मचारी भरतीसाठी अधिकार देण्यात आले आहेत़ परंतु तेथे देखील प्रक्रिया करण्याच्या इच्छाशक्तीचा मोठा अभाव दिसत आह़े यामुळे शासकीय रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य रूग्णालय याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाह़ी कोविडची तिसरी लाट येऊन ठेपली तरी ही कमतरता भरून काढावी यासाठी कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाह़ी
वैद्यकीय अधिकारी सार्वजनिक आरोग्य सेवेला मिळावेत यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे सरकारचे म्हणणे आह़े व्यवहारात मात्र असे वैद्यकीय अधिकारी पुरेशा संख्येने भरले जात नाहीत़ पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये काम करण्यासाठी बंधपत्र घेण्याची तरतूद आह़े मात्र त्याचा कठोर अवलंब करण्याची इच्छा सरकारी पातळीवर दिसत नाह़ी याकडे वैद्यक म्हणून बाहेर पडणारी मुले अन्य संधी शोधून त्याकडे वळत आह़े शासकीय पातळीवर इच्छा शक्तीचा अभाव असल्याने सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये पुरेसा वैद्यक वर्ग नाही ही वस्तुस्थिती आह़े
कोविडच्या पहिल्या दोन लाटा येऊन गेल्या तेव्हा वैद्यकीय अधिकाऱयांची टंचाई भासली होत़ी यावेळी खासगी वैद्यकांनी पुढे येऊन सार्वजनिक आरोग्य सेवेतील रूग्णांना उपचाराची सेवा दिली होत़ी गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकारी पुरेशा संख्येने उपस्थित ठेवणे गरजेचे होत़े परंतु त्याकडे लक्ष †िदले जात नाह़ी
एका बाजूला कोरोना रूग्णांची संख्या कोकणातील सर्वच जिह्यांमध्ये वाढत आह़े असे असताना प्रभावी अंमलबजावणीचे आवाहन मात्र वारंवार केले जात आह़े तथापि रूग्णवाढ काही थांबत नाह़ी याचा परिणाम म्हणून गंभीर रूग्णसंख्येत वाढ होईल़, अशी भीती व्यक्त होत आह़े गंभीर रूग्णांना अतिदक्षता विभागात उपचार द्यावे लागतात़ त्यासाठी प्राणवायू सकट अनेक साधनांची गरज असत़े कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी आम्ही सज्ज आहोत अशी भूमिका जिल्हास्तरीय अधिकाऱयांपासून राज्यस्तरीय अधिकाऱयांपर्यंत सर्वचजण मांडत असतात़ व्यवहार मात्र त्यापेक्षा वेगळा आह़े एकटय़ा रत्नागिरी जिह्यात प्राणवायू पुरवठादारांचे दोन कोटी रूपयांहून अधिक पैसे देणे बाकी आह़े सरकारकडे एकतर पैसा नाही म्हणून देयके थकली आहेत़ किंवा पैसा असून वेगळ्य़ाच कारणांसाठी ती रखडवली जात आहेत़, असा आक्षेप घेण्यात येत आह़े
कोरोनाच्या तिसऱया लाटेत गंभीर रूग्णांना प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने व्यापक स्वरूपात पायाभरणी केली आह़े अपेक्षित जागी प्राणवायू उत्पादन केंद्र उभारण्यात आली आहेत़ त्या सर्वांची चाचणी घेऊन रूग्णसेवेसाठी ती सिद्ध राहतील याची काळजी घेतली पाहिज़े अचानक बंद पडलेली प्राणवायू उत्पादन केंद्रे सुरू व्हावीत़ दुरूस्ती यंत्रणेची तैनाती झाली पाहिज़े अन्यथा गरज असताना प्राणवायू तुटवडा भासण्याची भीती आह़े
सर्वसामान्य लोकांचे दैनिक जीवन विनाव्यत्यय सुरू रहावे यासाठी सरकारी यंत्रणेने दिलासा देणे आवश्यक आह़े यापूर्वी व्यापारी तसेच ग्राहक यांना विश्वासात न घेता कोणाच्यातरी मनात आले म्हणून आदेश काढण्याची पद्धत पडून गेली आह़े याला रोखले गेले पाहिज़े आहेत अधिकार म्हणून ते वापरण्याऐवजी कोरोनाची साथ पसरणार नाही यासाठी अत्यावश्यक वेळीच ते वापरावेत अशी भूमिका सरकारी अधिकाऱयांनी घेतली पाहिजे तरच दीर्घ काळाच्या कडक टाळेबंदीपासून सामान्य लोकांची सुटका होउढ शकेल़
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिणाम होणाऱया सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे अशा घटकांशी किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बोलून मगच टाळेबंदीसारख्या उपाययोजनांवर विचार झाला पाहिजे. सध्या ज्या गावात कोरोना रुग्ण नाहीत तेथेही शिक्षणबंदी लागू झाली आहे.
काळजीच्या नावाखाली थोडीशी जास्तच कठोर उपाययोजना झाल्यामुळे शैक्षणिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. जेथे साथ प्रसाराची भीती प्रत्यक्ष दिसत आहे तेथे निर्बंध जरूर लावावेत पण साथ येणार म्हणून अगोदरच कठोर उपाययोजना करणे हे अन्यायकारक ठरणारे आहे.