पलुस / प्रतिनिधी
पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगाव येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीराचे आयोजन, तुरची कारखाना येथील चालकाना वाहतुकीचे नियम व चिन्हे बाबत माहिती देण्यात आली, तुरची परिसर व शाळा मध्ये महिलांच्या वरील अत्याचार व पोक्सो अॅक्ट बाबत माहिती देन्यात आली, प्रशिक्षण केंद्र जवळील शाळा व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले,पोलीस प्रशिक्षण केंद्रात कोविड बाबत जनजागृती, वाख्यान,आरोग्य विषयक माहिती देण्यात आली.
हा सर्व कार्यक्रम मा. प्राचार्य ज्योती क्षीरसागर,उप प्राचार्य ढोले पाटील सर्व अंतर वर्ग व बाह्य वर्ग अधिकारी व कर्मचारी याच्या उपस्थित पार पडला.