नवी दिल्ली
रिझर्व्ह बँकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंजाब नॅशनल बँकेने व्याजदर 40 बेसीस पॉइंटस्ने कमी केले आहेत. बँकेचा रेपो लेंडिंग दर घटून 6.65 टक्के इतका झाला आहे. दुसरीकडे मुदत ठेवीवरील व्याजदर 50 बेसीस पॉइंटस्ने कपात करण्यात येणार असून याची अंमलबजावणी 1 जुलैपासून केली जाणार आहे. मुदत ठेवीवरचा व्याजदर अगदी 5.50 टक्केपर्यंत खाली येणार आहे.