ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात सोमवारी दिवसभरात 399 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5181 वर पोहचली असून, मृतांची संख्या 264 एवढी आहे.
आज दिवसभरात 175 कोरोना रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे शहरातील 2 हजार 735 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आज दिवसभरात 2 हजार 436 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 60 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 186 जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 52 हजार 667 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 1 हजार 695 एवढी आहे.