वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेसला आता एलएचबी कोच
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावहून दिल्लीला प्रवास करणाऱया प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. वास्को-द-गामा-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला यापुढे एलएचबी कोच जोडले जाणार आहेत. 26 मेपासून एलएचबी कोच जोडले जाणार असल्याने प्रवाशांना उत्तम सेवा या कोचमध्ये मिळणार आहे.
रेल्वेप्रवास आरामदायी व्हावा, यासाठी अत्याधुनिक सेवासुविधा असणारे एलएचबी कोच रेल्वेला बसविले जात आहेत. सध्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांना एलएचबी कोच देण्यात आले आहेत. जुन्या कोचमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक समस्या येत होत्या. वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेसला यापूर्वी जुनेच कोच होते. यापुढे ही रेल्वे एलएचबी कोच जोडून धावणार आहे.