बेंगळूर
अयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य राम मंदिरासाठी राज्यातील ख्रिश्चन समुदायातील उद्योगपती आणि शिक्षणतज्ञांनी एक कोटी रुपये देणगी दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी दिली. बेंगळुरात रविवारी सकाळी आयोजिलेल्या ख्रिश्चन समुदायातील उद्योगपती, शिक्षणतज्ञ, समाज सेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. भाजप पक्ष अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचे होत असलेले आरोप खोटे आहेत. अनेक वर्षांपासून याबाबत अपप्रचार केला जात आहे. मात्र, भाजप पक्ष राज्यातील सर्वांच्या पाठिशी आहे, असेही ते म्हणाले.