श्री. छ. अभयसिंहराजे भोसले स्मृती उद्यानातील प्रकार,
प्रतिनिधी/ सातारा
श्री. छ. अभयसिंहराजे भोसले स्मृती उद्यानातील विद्युत दिवे खांबांवरून गायब झाले आहेत. तर अज्ञातांनी आकर्षक विद्युत दिव्यांची तोडफोड केली आहे. याकडे सातारा नगरपालिकेने दुर्लक्ष केले असून यांची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी जेष्ठांकडून होत आहे.
राजपथावरील सातारा नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या श्री. छ. अभसिंहराजे भोसले स्मृती उद्यान लॉकडाऊननंतर खुले करण्यात आले आहे. यामुळे बालचिमुकले, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठय़ा संख्येने येत आहे. या उद्यानात लाईटची सोय करण्यात आली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाचे चित्र बदलले आहे. येथील विद्युत दिवे अज्ञातांनी फोडले आहे. तर काही दिवे गायब झाले आहेत. यामुळे सायंकाळी या उद्यानात अंधार पडत आहेत. उद्यानात येणाऱया नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत आहे. या दिव्यांच्या दुरूस्तीकडे सातारा पालिकेने दुर्लक्ष केले आहे. वारंवार मागणी करूनही कोणत्याच सोयी-सुविधा देण्यात आलेल्या नाहीत असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.