ऑनलाईन टीम / चेन्नई :
सुपरस्टार रजनीकांत आपल्या आरोग्य तपासणीसाठी अमेरिकेत गेले आहेत. काल (18 जून) रात्री उशिराने एका विशेष फ्लाईटने अमेरिकेत रवाना झाले आहेत. चेन्नई एअरपोर्टवरील रजनीकांत आणि लता यांचे फोटो देखील समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांची मुलगी पहिल्यापासूनच अमेरिकेत आहेत. साधारण पुढील तीन आठवडे तरी रजनीकांत हे अमेरिकेत राहणार आहेत. तिथे त्यांच्या आरोग्य विषयक विविध तपासण्या केल्या जाणार आहेत.
दरम्यान, रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जाण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. केंद्राकडून अमेरिकेत जाण्यासाठी विशेष परवानगी मिळाल्यानंतर ते अमेरिकेत गेले आहेत. मागील काही वर्षापासून रजनीकांत यांची प्रकृतीमध्ये चढ – उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य तपासणीसाठी अमेरिकेत जायचे होते. मात्र, सध्या देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना विदेशात जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागली.