पुरात वाहून गेली पिल्ले , तहानभूक विसरून प्रतीक्षा करत आहेत श्वान
उत्तराखंडच्या चमोली जिल्हय़ात ऋषि गंगा, अलकनंदा नदीत आलेल्या पुरामुळे सर्वकाही उद्ध्वस्त झाले आहे. तर एका मातेची आशा अद्याप जिवंत आहे. एक मादी श्वान पुरात वाहून गेलेल्या स्वतःच्या पिल्लांची तहानभूक हरपलेल्या स्थितीत प्रतीक्षा करत आहे.
पूराच्या दिवसापासूनच या श्वानाने काहीच खाल्लेलं नाही अशी माहिती स्थानिक लोक देतात. मादी श्वानाला अनेकदा अन्न देण्याचा प्रयत्न केला असता तरीही त्याकडे पाहत देखील नाही. ती स्वतःच्या पिल्लांन शोधण्यासाठी इकडे-तिकडे जात राहते. तिच्या रडण्याचा आवाजही अनेकदा लोकांनी ऐकला आहे. 7 दिवसांपेक्षा अधिक काळापासून या श्वानाला स्वतःच्या पिल्लांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पुराच्या दिवसापासूनच ही मादी श्वान रैंणी गावात ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पानजीक प्रतीक्षा करत आहे. या श्वानाची 3-4 पिल्ले 7 फेब्रुवारी रोजी आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती.