- अंगारकीला ‘असे’ घेता येईल श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले होते. अद्यापही तिसऱ्या लाटेचा पूर्णपणे उठवण्यात आलेले नाहीत. हे निर्बंध मंदिर दर्शनासाठीही लागू आहेत. मात्र अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून गणेशभक्तांसाठी खूशखबर देण्यात आली असून ऑनलाईन गणेश दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना 24 तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड 19 संसर्ग निर्बंध नियमावली नुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घ्यावे,’ अशी विनंती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आदेश बांदेकर यांनी केली आहे.
दरम्यान, अनलॉक प्रक्रियेनंतर अनेक गोष्टींना मुभा दिल्यानंतरही मंदिर दर्शनाबाबत निर्बंध ठेवण्यात आल्याने भाजपकडून वारंवार राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण यापूर्वीच सरकारकडून देण्यात आले आहे.