पोलीस, सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट बंदोबस्त
प्रतिनिधी/कोल्हापूर
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱया दिवशी शुक्रवार दुपारपर्यंत आई अंबाबाईच्या दर्शनास ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांची गर्दी तुरळक प्रमाणात होती. उन्हाचा चटका बसत असल्याने शिवाजी चौकापासून भवानी मंडपपर्यंतच्या रांगेतील भाविक मंदिर परिसरात उभारलेल्या मंडपात जाण्यासाठी धावत होते. स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या भाविकांच्या हातात मात्र पाण्याच्या बॉटल्स दिसत होत्या. गुरुवारी अंबाबाई मदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेनंतर जो गोंधळ झाला होता. त्याचा कुठलाही परिणाम शुक्रवारी जाणवत नव्हता. पोलीस प्रशासन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा रक्षकांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे मंदिर परिसरातील वातावरण तणावमुक्त होते. भाविकांच्याही चेहऱयावर कुठल्याही प्रकारची भीती जाणवत नव्हती.
लांबून येणाऱया भाविकांना चारचाकी, दुचाकी गाडÎा पार्किंग करण्यासाठी जागा शोधावी लागत होती. त्यामुळे भाविकांना ई-पास कक्षात पोहोचण्यासाठी वेळ लागत होता. दरम्यान, ज्या दिवशीचे बुकिंग आहे त्याच दिवशी दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता. दोन भाविकांनी गुरुवारचे बुकिंग केले होते. त्यांना शुक्रवारी प्रवेश दिला नाही.
दुर्गामातेच्या गीतांनी परिसर भक्तिमय
शिवाजी चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड परिसरात दुर्गामातेच्या गाण्यांनी वातावरण भक्तिमय, मंगलमय झाले होते. महाद्वार रोड इथे देवस्थान समितीने भव्य एलईडी क्रीन उभारली असून, क्रीनवर आई अंबाबाईचे दर्शन भाविक घेत होते.
ई पास व्यवस्थापन कक्षात नियोजनबद्धता
शिवाजी चौकातील ई पास कक्षात नियोजनबद्ध कामकाज सुरू होते. तीन रांगामुळे कुठलाही गोंधळ, गडबड नव्हती. काही तांत्रिक अडचणी जाणवत असल्यास तेथील शासनाचे प्रतिनिधी, देवस्थान समितीचे पदाधिकारी भाविकांना समजावून सांगत होते. दरम्यान, जुना राजवाडा पोलीस स्टेशनजवळ मेफत कोरोना लसीकरण महापालिपेतर्फे सुरू होते.