प्रतिनिधी / बेळगाव :
लोंढा-तिनईघाट रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या अकराळ गावाजवळ अनोळखीने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे. यासंबंधी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव रेल्वे पोलिसांनी सुमारे 50 वषीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यात येत आहे.
5.5 फूट उंची, अंगाने सुदृढ, काळसर वर्ण असे त्याचे वर्णन असून त्याने आपल्या अंगावर पांढरा व काळा चौकडी शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली होती. बेळगाव व शेजारच्या जिह्यातील पोलिसांना या संबंधीची माहिती देण्यात आली असून बेपत्ता इसमांविषयी तपास करण्यात येत आहे. संबंधितांनी 0831-2405273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.