ऑनलाईन टीम / पुणे :
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसार केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पसंतीक्रम नोंदणीला उद्या म्हणजेच बुधवारपासून सुरुवात होणार आहे त्यामध्ये प्रवेश प्रक्रिया चा दुसरा भाग करावा लागेल अकरावीच्या पहिल्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक मराठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सोमवारी जाहीर केले.
त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे प्रवेश वर्षाचा दुसरा भाग भरून पहिल्या फेरीत प्रवेश घेता येणार असल्याचे केंद्रीय प्रवेश नियोजन समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, या वर्षी प्रवेश प्रक्रियेसाठी 304 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1लाख 6 हजार 812 जागा उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेत सर्वाधिक म्हणजेच 46,981 जागा असून सुमारे 90 हजार 648 नोंदणी केली आहे. तर 61 हजार 883 जणांनी अर्जाचा पहिला भरून लॉक केला आहे. 30 हजार 120 विद्यार्थ्यांचे अर्ज ऑटो व्हेरिफाईड आणि 20,410 विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाईड करण्यात आले आहेत.
- अशी आहे प्रवेश प्रक्रिया
- पसंतीक्रम आणि कोटा प्रवेशासाठी शून्य फेरी : 12 ते 22 ऑगस्ट
- पहिली नियमित प्रवेश फेरी : 23 ते 25 ऑगस्ट
- नियमित पहिल्या प्रवेश करण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर : 30 ऑगस्ट
- पहिली फेरी अकरावी प्रवेश निश्चिती : 31 ऑगस्ट 3 सप्टेंबर
महाविद्यालयांना 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी लागेल असेही शिक्षण विभागाकडून यावेळी सांगण्यात आले.