ऑनलाईन टीम / अकोला :
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने आता अकोल्यात ही हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. अकोल्यात कोरोनामुळे झालेल्या पहिल्या बळींची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी सायंकाळी एक रुग्ण सर्दी, खोकला, मधुमेह या आजारामुळे दाखल झाला होता. खबरदारी म्हणून या रुग्णांची घशाचे नमुने कोरोना टेस्टसाठी घेण्यात आले होते. मात्र, त्याचं दिवशी रात्री उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आज सकाळी मिलेलेल्या रिपोर्ट नुसार, तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 14 वर पोहोचली आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आणि एकाने आत्महत्या केली असून उर्वरित 12 जणांवर उपचार सुरू आहेत.
सोमवारी मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती शासकीय मेडिकल महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.