अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट तालुक्यात आतापर्यंत ४९ कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहेत. शुक्रवारी ५ कोरोना रुग्ण मिळाल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. शुक्रवारी आणखीन पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .खाजगी लॅब मधून हे अहवाल मिळाले आहेत .यामध्ये अक्कलकोट ग्रामीण १, ३ बोरगाव आणि एक गुरववाडी येथील रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आढळलेल्या अक्कलकोट ग्रामीण, बोरगाव व गुरववाडी येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या 25 जणांचे स्वॅब मंगळवारी घेण्यात आले होते.
त्यापैकी 31अहवाल निगेटिव्ह आले होते, तर 14 अहवाल प्रलंबित होते. अक्कलकोट ग्रामीण भागात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना कोरोनाची लागण झाली आहे. अक्कलकोट शहर -तालुक्यातील कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचें पालन करावे.कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. नागरिकांनी घरीच सुरक्षित राहावे. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले आहे.