प्रतिनिधी/ बेळगाव
बैलहोंगल तालुक्यातील सुक्षेत्र इंचल येथे सध्या शिवयोगीश्वर साधू संस्थानमठाचा अखिल भारतीय वेदांत परिषदेचा सुवर्णमहोत्सवी सोहळा सुरू आला आहे. त्यानिमित्त या महोत्सवामध्ये देशभरातून आलेले साधू-संत प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
या सोहळय़ामध्ये संस्थानमठाचे पीठाधीश डॉ. शिवानंद भारती स्वामीजी यांचा 80 वा जयंत्युत्सव देखील साजरा होत आहे. याचे उद्घाटन सोमवारी सकाळी झाले. उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून हंपी येथील हेमकूट शिवराम अवधूत आश्रमचे प. पू. विद्यानंद भारती स्वामीजी उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच जीवनामध्ये संस्काराचे महत्त्व विषद केले.
त्यानंतर आंध्रप्रदेश येथील षण्मुखानंद आश्रमाच्या प. पू. ज्योतीर्मयानंद माताजी, हुबळी येथील रामानंद स्वामीजी, काशी येथील राजराजेश्वरी मठाचे आचार्य दिव्यचैतन्य स्वामीजी आदींनी आपले विचार व्यक्त केले. सोहळय़ामध्ये विविध प्रांतांमधून आलेले भक्तगण मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत.