कीव्ह / वृत्तसंस्था
युद्धाच्या तिसऱया दिवशी रशियन सैन्याने पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला चढवला आहे. कीव्हमध्ये आगेकूच चालू ठेवण्याबरोबरच आणखी एका शहरावर ताबा मिळविल्याचे रशियाने म्हटले आहे. तथापि, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा एकदा जनतेला आवाहन करून या लढय़ात ज्यांना मदत करायची आहे, त्यांना शस्त्रे पुरवू, असे सांगत लढाई चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच त्यांनी मित्रदेशांकडेही मदत मागितली आहे. फ्रान्सने याबाबत सकारात्मकताही दर्शवली आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ठेवलेला प्रस्ताव झेलेन्स्की यांनी नाकारत देश सोडून बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत युक्रेनचे 800 लष्करी तळ नष्ट केल्याचा दावा रशियाने केला आहे. यामध्ये 14 लष्करी एअरफील्ड, 19 कमांड पोस्ट, 24 ए-300 विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आणि 48 रडार स्टेशनचा समावेश आहे. याशिवाय युपेनी नौदलाच्या 8 बोटीही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. दुसरीकडे, युपेनने 3,500 रशियन सैनिक, 02 टँक, 14 विमाने आणि 8 हेलिकॉप्टर मारल्याचा दावा केला आहे. युक्रेनचे सैन्य सध्या कीव्हसह इतर महत्त्वाच्या शहरातील प्रमुख ठिकाणांवर नियंत्रण ठेवत आहे. रशियन सैन्याविरुद्ध रस्त्यावरही लढाई सुरू झाली आहे. शनिवारी जारी केलेल्या इशाऱयानुसार रहिवाशांना आश्रयघरांमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच खिडक्मया किंवा बाल्कनीजवळ जाणे टाळा, असेही सांगण्यात आले. रशियन जवान लोकांना घाबरवत असून त्यांना शरण येण्याची सूचना करत आहेत. धोका वाढल्यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असे वारंवार सांगितले जात आहे. युपेनमध्ये बॉम्बस्फोट सुरू असल्यामुळे स्थानिक लोक प्रचंड घाबरले आहेत. भयभीत झालेले लोक बचावासाठी देश सोडत असून एक लाखाहून अधिक युपेनियन लोकांनी सीमा ओलांडून पोलंडमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
मदत पुरविण्याचे फ्रान्सचे आश्वासन
या भीषण युद्धात युक्रेनला फ्रान्सचा पाठिंबा मिळाला आहे. युपेनच्या राष्ट्राध्यक्षांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर त्यांनी युपेनला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोलल्यानंतर, आमच्या मित्र देशांकडून शस्त्रे आणि उपकरणे युपेनला पाठवली जातील. युद्धविरोधी अन्य देशही सक्रीयपणे कार्यरत होत आहेत, असे ट्विट राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले.
युक्रेनच्या मेलिटोपोल शहरावर ताबा ?
येथे रशियन सैन्याने युपेनमधील मेलिटोपोल शहरावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. रशियन सैन्याने आता शहर पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. तसेच कीव्हवरही कब्जा करण्यासाठी रशिया सातत्याने हल्ले करत आहे. दुसरीकडे, ब्रिटीश सशस्त्र सेना मंत्री जेम्स हॅप्पी यांनी मेलिटोपोल शहर ताब्यात घेतल्यासंबंधीचा रशियन सैन्याचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, रशियाने कीव्ह येथे दोन क्षेपणास्त्रे डागली आहेत. पहिले क्षेपणास्त्र झुल्यानी विमानतळाजवळ आणि दुसरे निवासी इमारतीवर पडल्याचे सांगण्यात आले. तसेच कीव्हमधील व्हिक्ट्री अव्हेन्यूवर रशियाने लष्करी तुकडय़ांना लक्ष्य केल्याचे वृत्त आहे.
जर्मनी, पोलंडसह इतर युरोपीय देशांकडून लष्करी कारवाईचा निषेध
भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी युपेनमधील परिस्थितीवर पुतीन यांनी छेडलेल्या युद्धाचा निषेध केला आहे. ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले आणि आर्थिक निर्बंधांसह अन्य कारवाया करण्याचा इशाराही दिला. तसेच पोलंड आणि इतर युरोपीय संघ देशांनीही रशियाच्या युपेनवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला. त्याचबरोबर युपेनमधील रशियन आक्रमणातून वाचलेल्या भारतीयांना आम्ही पोलंडमध्ये मदत करत आहोत, अशी ग्वाही पोलंडचे भारतातील राजदूत ऍडम बुराकोव्स्की यांनी दिली.
अतिशय धोकादायक टप्प्यावर युद्ध
युपेनच्या सागरी हद्दीत एका जपानी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. जहाजाच्या एका भागाला आग लागली असून हे क्षेपणास्त्र रशियन सैन्याने डागल्याचे मानले जात आहे. जहाजाचे खूप नुकसान झाले आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि नाटो थेट युद्धात सहभागी झाले तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
लढण्यासाठी युद्धसामुग्री द्या, पळण्यासाठी विमान नको!
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये मदतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांना युपेनमधून सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘एक्झिट प्लान’ दिला. मात्र, झेलेन्स्की यांनी रशियन फौजांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त करत आपण कीव्हमध्येच राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगत अमेरिकेची मदत नाकारली. त्यानंतर झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओही जारी केला असून “आम्ही सर्व इथे आहोत. आमचे सैन्य इथे आहे. आपल्या समाजातील नागरिक येथे आहेत. आम्ही सर्व इथे आमच्या स्वातंत्र्याचे, आमच्या देशाचे रक्षण करत असून यापुढेही लढणार आहोत’ असे झेलेन्स्की राष्ट्रपती भवनाच्या बाहेर उभे राहून म्हणाले. युपेनच्या संरक्षण विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून झेलेन्स्की यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.