रंगराव हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होतं. त्यांना लो बी पीचा त्रास होता. त्यामुळे त्याने नोकरी लागल्यावर चिडखोर स्वभावाचा साहेब असलेल्या डिपार्टमेंटला बदली करून घेतली होती. चिडखोर साहेबाने दिवसभर कितीही त्रागा केला तरी त्याचं लो बी पी फार वर चढत नसे. संध्याकाळी बायकोने आदळआपट केल्यावर मात्र ते किंचित नॉर्मल होई.
रिटायर झाल्यानंतर मात्र त्यांना साहेबांची आठवण येऊ लागली. पण आता साहेब कुठून भेटणार? त्यांचं बीपी कोण वाढवणार? रंगरावांनी पेपरात जाहिरात दिली. लो बीपीवाल्यांचं एक संमेलन बोलावलं. लॉकडाऊन नुकतंच शिथिल झालं होतं. त्यामुळे एका चहाच्या टपरीवर सगळे एकत्र जमले. रंगरावांनी तोंडावरचा मास्क काढून सर्वांचं स्वागत केलं. सर्वांनी चहा घेतला. मग रंगरावांनी सर्वांना स्वतःची समस्या सांगितली आणि मार्गदर्शनाची विनंती केली. एकेकाने आपले अनुभव सांगायला सुरुवात केली.
“मी रोज सकाळी घराच्या दारात उभा राहतो. मास्क चेहऱयावर आणि नाकावर न ठेवता हनुवटीवर किंवा गॉगल्सप्रमाणे डोक्मयावर ठेवून सिगारेट फुंकत जाणारे लोक किंवा मास्क नाकावर ठेवला असला तरी मधूनच तो बाजूला करून पचकन रस्त्यावर थुंकणारे लोक पाहिले की आपल्या शहराचं काही होणार नाही याची खात्री पटते. मग माझं लो बी पी वर चढतं आणि नॉर्मल होतं.’’“मी रोज मराठी बातम्या ऐकतो. अशुद्ध मराठी ऐकलं की माझं पित्त हळूहळू खवळायला सुरुवात होते. शिवाय ते वृत्तनिवेदक उगीच कोणत्याही फालतू बातमीला ‘एक मोठी बातमी’, ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘एक ताजा अपडेट’ म्हणून किंचाळू लागले की माझं बी पी नॉर्मल होतं.’’ “मी सासूबाईची मालिका बघतो. माजोरडा मुलगा, मूर्ख आई आणि बावळट बाप यांचे संवाद ऐकले की माझं लो बी पी वाढत जातं. रोज त्या मुलाने अपमान केल्यावर ते आई आणि बाप शेपूट घालताना दिसले की माझं बीपी नॉर्मल होतं.’’
“मी इंग्रजी बातम्या बघतो. समोरच्या कोणाला बोलू न देणारा आणि कानठळय़ा बसवणाऱया आवाजात उगीचच प्रत्येकाच्या अंगावर वचावचा ओरडणारा निर्बुद्ध अँकर दिसला की आधी डोकं दुखायला लागतं. नंतर लो बीपी वर जातं आणि नॉर्मल होतं.’’
रंगरावांनी सर्वांचे आभार मानले.
@ @ @
वैधानिक इशारा -लेखातले लो बीपी आणि त्यावरचे उपाय देखील काल्पनिक आहेत.
@ @ @