फिरोज मुलाणी / सातारा
वड…वड…धर..धर..उचल…दाबून धर….अशा उठणाया आरोळ्या, चुरशीच्या लढतीत गुणांचा वर खाली होणारा फलक पाहून अनेकांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. विजयासाठी सर्वस्व पणाला लावीत महिला कुस्तीगीरांनी आज अजिंक्यपदाचा आखाडा गाजवला.दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ग्रुहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मराठमोळा कुस्ती खेँळाला चालना मिळण्यासाठी राज्य शासन कुस्तीगीर परिषदेच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही दिली.
आज सकाळी भारत विकास ग्रुपच्या सातारा मेगा फूड पार्क ( वळसे , सातारा ) येथे 23 व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला सुरवात झाली. साखळी फेरीतून अंतिम फेरी गाठलेल्या महिला मल्लांनी आपला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील अनुभव पणाला लावून अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. 53 किलो वजन गटात स्वाती शिंदेने ठाण्याच्या कोमल देसाईला भारंदाज डावावर चितपट केले. 62 किलो गटात कोल्हापूरची गोल्डन गर्ल रेश्मा मानेने सातारची शिवांजली शिंदे हिला अवघ्या एक मिनिटात आसमान दाखवले.59 किलो गटात आंतरराष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फड हिने कोल्हापूरच्या स्मिता पाटीलला डोईजड होऊ दिले नाही. 62 किलो मध्ये स्रुष्टी भोसलेने कोल्हापूरच्याच अंकीता शिंदेवर नेत्रदीपक विजय मिळवला. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे ः-
वजन गट – 50 किलो
नंदीनी. साळोखे (कोल्हापूर),53 किलो स्वाती शिंदे ( कोल्हापूर ), 55 किलो अंजली पाटील ( सांगली ), 57 किलो सोनाली मंडलिक (अहमदनगर) 59 किलो भाग्यश्री फंड (अहमदनगर )
62 किलो सृष्टी भोसले ( कोल्हापूर )
65 किलो रेश्मा माने ( कोल्हापूर ), 68 किलो
वेदान्तिक पवार (सातारा), 72 किलो प्रतीक्षा बागडी ( सांगली ) ,76 किलो संजना बागडी( सांगली) विजेत्या महिला कुस्तीगीरांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुपारी ग्रुहराज्यमंत्री ना.शंभूराजे देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे,उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, हणमंतराव गायकवाड, तानाजी निकाळजे, सुरेश पाटील, प्रा. दिलीप पवार, नवनाथ ढमाळ, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे साहेबराव जाधव धनाजीकाका पाटील प्रा.बंकट यादव, उपस्थित होते.
स्वातीचा दणका
आजच्या 53 किलो वजनगटात आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर स्वाती शिंदे हिने साखळी फेरीतील अंतिम फेरीपर्यंतच्या कुस्त्या 10 सेकंद, 20सेकंद, 30सेकंद आणि 1 मिनिटात जिंकून प्रतिस्पर्धी मल्लांचा फडशा पाडत आपण भरात असल्याचे सिद्ध केले.तिच्या नेत्रदीपक खेळाचे उपस्थितांनी कौतुक केले.
स्वाती नंदीनीच्या खिलाडूव्रुत्तीचे कौतुक.
53 किलो वजनगटात आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती शिंदे विरुद्ध ठाण्याची दिशा गोरवेकर यांच्या लढतीत स्वातीने समोरून झोळी बांधून दिशाला चितपट केले. लढती दरम्यान दिशा पोटाचा स्नायू दुखावल्याने ती विव्हवळत पडली होती मात्र स्वातीने स्वतः तीला मसाज करून उठण्यासाठी मदत केली. तर नंदीनी साळोखे हिने देखील 52 किलोच्या लढतीत जखमी प्रतिस्पर्धी मल्लाला मदत केली त्यांच्या खिलाडूव्रुत्तीचे सर्वांनी कौतुक केले.
बीव्हीजीचे हणमंत गायकवाड यांना कुस्तीची भुरळ
अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा बीव्हीजीच्या मेघा फूड पार्क येथे होत आहेत. स्पर्धेचे आयोजक निकाळजे ट्रान्सचे तानाजी निकाळजे आणि बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड स्पर्धा पार पडेपर्यंत थांबून होते. हणमंतराव गायकवाड यांनी अनेक चुरशीच्या लढतीचा प्रेक्षकात बसून आनंद लुटण्याबरोबर आपल्या मोबाईल मध्ये शूटींग करुन स्पर्धेचा आनंद लुटला.