टिळकवाडी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी पोलिसांनी एका अट्टल मोटार सायकल चोरला अटक केली आहे. त्याच्या जवळून 5 चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
सैफुल्ला खाजीम तहसीलदार (वय 32, रा. उज्वलनगर, बारावा क्रॉस) असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल स्वाराचे नाव आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमनी, हवालदार के. के. सौदत्ती, सैय्यद गुडारद, एम. एस. कळ्ळीमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
शुक्रवारपेठ-टिळकवाडी येथे मोटार सायकल चोरीची घटना घडली होती. चोरीची मोटार सायकल शोधताना उज्वलनगर येथील सैफुल्लाला अटक करुन त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने चोरीची कबुली दिली. बेळगाव शहर व उपनगरांतून त्याने चोरलेल्या एकूण पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.