वार्ताहर / पणदूर:
अणाव-आंबेडकरनगर येथील रहिवासी सौरभ संतोष अणावकर (17) याचे 12 एप्रिल रोजी निधन झाले. पणदूर येथील शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीची पुनर्परीक्षा दिली होती. 28 मार्चला सौरभला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले होते. सौरभच्या डोक्यात गाठी झाल्या होत्या. त्या स्पेड होऊन त्यात पल्स झाला. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. 28 मार्चला त्याच्या डोक्यातून पल्स काढण्यात आला. सीपीआर येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने तेथीलच खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तेथेही पुन्हा 11 एप्रिल रोजी पल्स काढण्यात आला. तोपर्यंत त्याची परिस्थिती खूपच चिंताजनक झाली होती. शेवटी रविवारी सौरभची प्राणजोत मालवली. यापूर्वी त्याला हृदयरोगाचा त्रास होता. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याचे ऑपरेशन झाले होते. त्यातून तो सावरत असताना मेंदूत गाठी झाल्या. त्याची शस्त्रक्रियाही असफल झाली व सौरभचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहीण, भावोजी तसेच मामा कवी अरुण नाईक असा परिवार आहे.