@ प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांत अथणी व गोकाक तालुक्मयातील दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आठवडय़ाभरात कोरोनामुळे जिह्यातील 7 जणांचा बळी गेला असून आतापर्यंत आठ जण दगावले आहेत. सोमवारी आणखी 16 रुग्णांची भर पडली असून एकूण बाधितांची संख्या 393 वर पोहोचली आहे.
24 तासांत दोन महिलांच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे. बिम्स्मधील कोव्हिड-19 वॉर्डमध्ये सेवा बजावलेल्या एका परिचारीकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ताजी असतानाच सोमवारी एका 22 वषीय डॉक्टर तरुणीला व 37 वर्षीय एक्सरे टेक्निशीयनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत.
पोटदुखीच्या त्रासामुळे रविवारी दुपारी कोण्णूर (ता. गोकाक) येथील एका 55 वषीय महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. स्वॅब तपासणी अंती तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सारीने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
रविवारी रात्री दरुर (ता. अथणी) येथील एका 60 वषीय वृध्देला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास जाणवल्याने तिला स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिचाही मृत्यू सारीने झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
29 जूनपासून सोमवार दि. 6 जुलै या वेळेत अथणी, बेळगाव, रायबाग तालुक्मयातील एकूण 7 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आठवर पोहोचली असून त्यामुळे संपूर्ण जिह्यात एकच खळबळ माजली आहे. राज्य आरोग्य विभागाने रविवारी रात्री जारी केलेल्या हेल्थ बुलेंटीनमध्ये याचा उल्लेख केला नाही. सोमवारी बेळगावात एकही पॉझिटिक्ह रुग्ण नसल्याचे अहवाल स्पष्ट केले असले तरी गेल्या 24 तासांत 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.
एका अथणी तालुक्मयातील 11, बेळगाव व निपाणी येथील प्रत्येकी 2 व कुडची येथील 1 असा 16 जणांचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. सदाशिवनगर, अथणी तालुक्मयातील अनंतपूर, अथणी, संकोनट्टी, चिक्कट्टी, कागवाड तालुक्मयातील जुगुळ येथील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने सोमवारी रात्री जारी केलेल्या बुलेटीनमधील माहितीनुसार जिह्यात केवळ 11 नवे रुग्ण आढळल्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.
डॉक्टर तरुणीला लागण
25 ते 30 जूनपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमधील कोव्हिड-19 मध्ये रुग्ण सेवा केलेल्या 22 वषीय डॉक्टर तरुणीचा अहवाल पॉझिटिक्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील 37 वषीय एक्सरे टेक्निशीयनलाही कोरोनाची लागण झाली आहे. तो मुळचा कब्बूर येथील राहणारा असून सध्या सेवेसाठी त्याला सिव्हिलला बोलावून घेण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांत डॉक्टर, परिचारीका व एक्सरे टेक्निशीयन अशा तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना विरुध्दच्या लढय़ात अग्रभागी असणारे योध्दय़ांनाही कोरोनाचा संसर्ग होवू लागला आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 हजार 387 अहवालांची प्रतिक्षा
आणखी 3 हजार 387 जणांच्या अहवालांची प्रतिक्षा असून एकूण बाधितांची संख्या सोमवारी 393 वर पोहोचली आहे. तर जिह्यातील 8 हजार 627 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. परराज्यातून येणाऱया चाकरमान्यांची संख्याही वाढत चालली असून सोमवारी क्वारंटाईनच्या नियमांतही बदल करुन संस्थात्मक क्वारंटाईन ऐवजी 14 दिवस होम क्वारंटाईनचा नवा नियम लागू करण्यात आला आहे.