शुक्रवारी आणखी 15 अहवाल पॉझिटिव्ह, बिम्स्मधील डॉक्टर तरुणीचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीमुळे रुग्ण दगावण्याची मालिका सुरुच आहे. गुरुवारी अथणी व हुक्केरी येथील दोन महिलांचा कोरोनामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. जिह्यातील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे.तर सिव्हिल हॉस्पिटलमधील एक डॉक्टर महिलेसह शुक्रवारी आणखी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बुधवार दि. 8 जुलै रोजी हुक्केरी येथील एका 58 वषीय महिलेला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर त्याच दिवशी अथणी येथील एका 65 वषीय वृध्देला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला आहे. स्वॅब तपासणी अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी बेळगाव शहर व तालुक्मयातील सहा जणांसह एकूण 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदाशिवनगर येथील 23 वषीय महिला, हिंदवाडी येथील 60 वषीय वृध्द, खासबाग येथील एक वषीय बालिका, येळेबैल येथील 55 वषीय रहिवासी, बसवानकुडची येथील 32 वषीय युवक, बेळगाव येथील 55 वषीय रहिवासी असे शहर व तालुक्मयातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.