नवी दिल्ली
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी नुकतेच 12 आंतरराष्ट्रीय बँकांकडून 1.35 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची उभारणी केली असल्याचे सांगण्यात येते. सदरची रक्कम एका कराराअंतर्गत 12 बँकांकडून घेण्यात आली असून याबाबत सर्व ते सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत. अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या कामासाठी सदरची उभारलेली रक्कम वापरली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. राजस्थानातील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य केलं जाणार आहे. कर्ज घेण्यात आलेल्या बँकांमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँक, इंटेसा सॅनपॉलो एसपीए, एमयुएफजी बँक, सुमितोगे मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन, कोऑपरेटीव्ह राबे बँक युए, डीबीएस बँक, मिजुहो बँक, बीएनबी परिबा, बार्कलेज बँक पीएलसी अशा बँकांचा समावेश आहे.