लॉजिस्टिकच्या क्षेत्रात वाटा 40 टक्क्यावर नेण्याचा निर्धार
नवी दिल्ली
बंदराच्या माध्यमातून विकासाची व्याप्ती साध्य करण्यासाठी अदानी पोर्टस्ची धडपड येत्या काळात वाढताना दिसणार आहे. अदानी पोर्टस् आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन यांनी येत्या काळामध्ये आपली कार्गो सेवा अधिक विस्तारित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदरच्या योजनेअंतर्गत लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये आपला बाजारातील वाटा 40 टक्के इतका करण्याचा निर्णय कंपनीने अलीकडेच घेतलेला आहे.
कंपनीचा सध्याचा लॉजिस्टीक्स या क्षेत्रातला वाटा हा 25 टक्के इतका आहे. 2025 पर्यंत कंपनी 500 दशलक्ष टन क्षमतेच्या मालाची हाताळणी करणार आहे. बंदरावरून होणाऱया मालवाहतुकीत वाढ होत असून याचा फायदा अदानी पोर्टस् यांनी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2021 च्या वार्षिक अहवालानुसार कार्गो क्षेत्रामध्ये अदानी पोर्टस्चा वाटा हा 25 टक्के इतका असून आगामी काळात तो 40 टक्केपर्यंत वाढवण्याची योजना आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने 247 दशलक्ष टन इतक्मया मालाची क्षमता हाताळली होती. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 11 टक्के क्षमतेत वाढ झाली आहे.