1500 पोलिसांची तंबूमध्ये वास्तव्याची व्यवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवार दि. 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱया कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलीस दलानेही बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे. बंदोबस्तासाठी परजिल्हय़ातून सुमारे 4 हजार पोलीस, 300 अधिकारी व 50 वरि÷ अधिकारी दाखल होत आहेत.
अधिवेशन बंदोबस्तासाठी येणाऱया पोलिसांच्या वास्तव्याची सोय करण्याचे मोठे आव्हान पोलीस दलासमोर होते. यासाठी शिंदोळीजवळ तंबू उभारण्यात आले असून या तंबूत 1500 पोलीस व 300 अधिकाऱयांची वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरात कंट्रोल रुम, वीज पुरवठय़ाची व्यवस्था, इस्पितळ, शौचालये, स्नानगृह, डायनिंग हॉल व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये 500 अधिकारी व पोलिसांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एमएलआयआरसी कॅम्पमध्ये 400 जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला अधिकारी व पोलिसांसाठी मच्छे येथील केएसआरपी येथे 250 जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्केटयार्ड जवळील पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये 350 जणांची राहण्याची सोय करण्यात आली असून बंदोबस्तासाठी येणारे पोलीस व अधिकाऱयांचे जेवण, खान व अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.