प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय पक्षी म्हणून असणाऱया मोराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. अनगोळ येथे ही घटना घडली आहे. अनगोळ मुख्य रोड येथे असणाऱया बँक ऑफ इंडियाच्या गच्चीवर मृतावस्थेत मोर आढळून आला. यामुळे पक्षीप्रेमींमधून शोक व्यक्त करण्यात आला.
शुक्रवारी सायंकाळी हा मोर मृतावस्थेत पडल्याची शक्मयता वर्तविली जात आहे. शनिवारी कामानिमित्त बँक कर्मचारी गच्चीवर गेले असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून याची माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱयांनी सायंकाळी हा मोर आपल्या ताब्यात घेतला. अन्नाच्या शोधात हा मोर आला असावा, असा अंदाज वनखात्याने व्यक्त केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर शुकशुकाट असल्यामुळे शिवार किंवा वनक्षेत्रात असणारे पशु व पक्षी शहराकडे वळले आहेत. अनगोळ शिवारात असणारे मोर अनगोळ उपनगरांमध्ये दृष्टीस पडत होते. पाणी, अन्नाच्या शोधात हे मोर मानवी वस्तीकडे येत असल्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येतात. हा मोर देखील अशाच प्रकारे आला असावा, अशी शक्मयता वर्तविली जात आहे.